STORYMIRROR

Jyoti Astunkar

Romance Tragedy

3  

Jyoti Astunkar

Romance Tragedy

नाही शोधू शकत

नाही शोधू शकत

1 min
335

नाही शोधू शकत मी, 

उत्तर स्वतःचे प्रश्नांचे,


तिचे ते डोळे, का मला हरवून घेतात,

तिचा तो स्पर्श, का मला आपलासा वाटतो, 

तिचा तो दुःख, का मला माझाच वाटतो, 

तिला होणारा शारीरिक त्रास, का मला भासतो,


तिचे ते डोळे भरून, मला बघणे,

जसे माझ्या हृदयाला, आतून स्पर्श करणे,  

तिचे माझ्या बरोबर असणे, 

जसे मी मलाच भेटणे,

तिला माझ्याशी लांब करणे, 

जसे माझ्या मनाला लांब करणे, 


तिचा माझ्यावर इतका प्रेम का?

याचे उत्तर शोधत राहणे, 

पण माझे का आहे प्रेम तिच्यावर?

हे स्वतःलाच न कळणे, 


ती बोलली, कारण आहे माझ्यावर इतके प्रेमाचे,  

पण मला नाही काही कारण, त्या आभासाचे, 

त्या आपुलकीचे, त्या प्रेमाचे ,

त्या काळजीचे, त्या वेडेपणाचे,


नाही शोधू शकत मी, उत्तर स्वतःचे प्रश्नांचे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance