STORYMIRROR

Jyoti Astunkar

Romance

3  

Jyoti Astunkar

Romance

हे सांगायला हवं का?

हे सांगायला हवं का?

1 min
344

तू माझा आणि मी तुझी,

माझ तुझ्यावर खूप – खूप प्रेम आहे

हे सांगायला हवं का?


समुद्राच्या काठी, तू आणि मी

संध्याकाळ ची वेळ, ओली वाळू, आणि थंड गार वारा

हातात हात घालून, एकांतात फक्त तुझा साथ

तू सोबत असताना,

खरंच आयुष्य किती छान वाटतं …

हे सांगायला हवं का?


तू माझा, आणि मी तुझीच

पण तू जवळ नसताना,

मन रिकामा का रे वाटतं?

तुझ्याशी बोलताना वेळ काय, ते कळतच नाही

क्षण हा इथेच का रे थांबतच नाही?

असं का वाटतं,

हे सांगायला हवं का?


दिवसभर दमून आलयावर

रात्री शांत झोपायची घाई असते

पण तू सोबत असताना

तुझा बरोबर गप्पा मारायला

झोपेची घाई नकोशी का वाटते…

हे सांगायला हवं का?


किती हि कामात असले तरी

मनात सतत तुझा विचार असणे

मधेच कधी तरी अचानक

तुझी खूप आठवण येणे

आताच बोलायचे आहे,

असं का रे वाटतं…

हे सांगायला हवं का?


माझ तुझ्यावर खूप – खूप प्रेम आहे

हे सांगायला हवं का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance