नाही कळले कधी
नाही कळले कधी
खुलता कळी हळुवार कधी खुलत गेली ,
नाही कळले कधी,
प्रीतीचा ह्या गंध बहरत गेला मनात ,
नाही कळले कधी,
माझं मन होतच तुझ्याकडे पण तुझं कधी आलं ,
नाही कळले कधी,
धुंद मस्तीत बेधुंद प्रीतीत
कधी दोघे मुरत गेलो ,नाही कळले कधी,
तुझ्या असण्याची मी जाणीव कधी बनत गेले, नाही कळले कधी,
कधी हवेत, कधी ढगात, भावनांच्या ह्या जगात कधी भ्रमत गेलो, नाही कळले कधी,
एकमेकांचे बनता बनता कधी तू आणि मी, कधी मी आणि तू झालो, नाही कळले कधी........