माझ्या मित्रा
माझ्या मित्रा
1 min
160
मित्रा, चल आज थोडं फिरायला जाऊत....
कृष्णकाठावर काही स्पर्शायला जाऊत....
मौनातल्या त्या मौनाला आज कुठला ही अर्थ 'न' देत जाऊत...
गरजांच्या दवबिंदूंवर सजलेल्या मोहक शब्दफुलांच्या ही पलीकडे जाऊत...
कधीही न उमजणाऱ्या त्या अव्यक्तात काही क्षण उतरत जाऊत....
जीवनधारेच्या निरपेक्ष वर्षावात आज चिंब भिजत जाऊत....
कुठल्याश्या त्या भावनेच्या किनारी प्रवाहात थोडं हरवत जाऊत....
काही न देता न घेता काही क्षण आज फक्त जगत जाऊत....
शब्दवलयांच्या मुळाशी थांबून आज दोघे निशब्द गाउत....
माझ्या मित्रा चल आज प्रवाहात ह्या हातात हात घेऊन वाहत जाऊत....
