STORYMIRROR

Shweta Gurav

Inspirational

3  

Shweta Gurav

Inspirational

मुलगी वाचवा

मुलगी वाचवा

1 min
1.0K

पेटी धनाची

हे मनी रुजवा

जनात ठसवा

लेक गुणाची


नको पणती

परक्याचे धन

न जाणले मन

भार म्हणती...


इवला जीव

फेकी कचऱ्यात

कधी गटारात 

कोणास कीव... ?


ती दुर्गा काली 

नाही आठवत 

का नाही वाटत 

ती लक्ष्मी आली...


सावित्रीबाई 

तिच्यात पाहूया 

झाशी बनवूया 

वा जिजाबाई... 


नाही अबला 

मुलगी वाचवा

मुलगी शिकवा

करा सबला... 


Rate this content
Log in

More marathi poem from Shweta Gurav

Similar marathi poem from Inspirational