STORYMIRROR

Vishu Ishwarkatti

Romance

3  

Vishu Ishwarkatti

Romance

मोरपंख

मोरपंख

1 min
319

तिच्या सुंदर चेहऱ्यासमोर,

जेव्हा जेव्हा तो उभा राहिला.

तेव्हा तेव्हा त्याला कळले की,

तो काळा आहे म्हणून.


त्या सुंदरतेशी स्पर्धा करण्यासाठी

काय काय फासलं नाही त्यानं चेहऱ्याला.

शेवटी ती गोरी ती गोरीच.

तो काळा तो काळाच.


एकदा तर तिच्या सुंदर चेहऱ्यावरती,

तो प्रचंड चिडला.

त्याला कळुन चुकलं की,

ती तुटून जाणाऱ्यापैकी आहे म्हणून


तो खिन्न होऊन उभा राहिला काळोखात.

तेव्हा ती शोधत आली,काळोखात ही काळा रंग.


तिने त्याच्या तळहातावर ठेवला एक मोरपंख.

तेव्हा त्याला कळुन चुकलं की, तो तिचा कोण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance