STORYMIRROR

Vishu Ishwarkatti

Abstract

4  

Vishu Ishwarkatti

Abstract

ll प्रवासातील भेट ll

ll प्रवासातील भेट ll

1 min
220

तु आणि मी 

रेल्वेच्या एका डब्यात, 

अवचितपणे ,अचानक. 

तु विचारलास ,

एक प्रश्न बरा आहेस का ? 

मी फक्त हसलो.

आयुष्य तुला कळले नाही कि मला.

आपण फक्त चालत आहोत. 

सारं काही मागे मागे जात आहे. 

खिडकीतल्या दृष्या सारखे.

असे अचानक का भेटतो आपण?

कशासाठी भेटतो? काहीच कळत नाही. 

आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबेल.

तु ही उत्तरशील. निघून जाशील.

पुन्हा कधी भेटशील माहीत नाही. 

जे मिळेल ते मिळवुन

आयुष्य जगुन आलो 

तर पुन्हा आपण येथेच भेटूया. 

त्यावेळी तु विचारू नकोस प्रश्न.

बरा आहेस का म्हणून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract