मनुष्य एक अज्ञातरूपी पक्षी
मनुष्य एक अज्ञातरूपी पक्षी

1 min

22
माणसांनी माणसांना सावरले
पण काही माणसांनी माणसांनाच विकून खाल्ले,
स्वातंत्र्यदिन जवळ येता
आठवते थोर वीरांची पराक्रम गाथा,
जे लढले माणुसकीसाठी
पण आजचे लढतात पैशांसाठी,
मान्य आहे पैसे बनवतात कुणाला धनवान
व काही जण जगतात समृद्ध आणि छान,
पण तो टिकवणे आणि वापरणे
आहे स्वतःत एक स्वाभिमान,
खूप जणांची घरे पैशांनी तुटताना बघितली
खूप कमी घर प्रेमानी जुळताना बघितली,
अरे मनुष्य आहे आजच्या युगाचा कर्ता-करविता
पण अजुनही आहे त्याच्या मस्तिष्काला
अंधविश्वास, धोखाधडी इत्यादींचा पडदा
कारण मनुष्य हा अज्ञानरुपी पक्षी आहे
ज्ञान फार आहे,
पण कुठं वापरायचं याच भान नाही आहे
कारण मनुष्य हा अज्ञान रुपी पक्षी आहे...