बहीण
बहीण




बहीण ही असते मातेचे प्रतिरूप,
पण भावाला रागवते देखील खूप
थोडा हसमुख थोडा चिडचिडा स्वभाव आहे चांगला
पण पुढच्या ने तिचे ऐकले नाहीतर त्याचे गाल समजा रंगाला
मी पिऊ लागतो चहा,
तर म्हणती मम्मी - पप्पा पहा,
तुमचा मुलगा परत पिऊ लागला चहा
काही दिवसापूर्वी पूजा मीच केली
त्या दिवशी म्हणाली
दुनिया कुठून उगवली
खेळ- खेळतां ना हरयचो मी खूप,
ती म्हणायची बस गप - चूप
माझी तर आहे मोठी बहीण
भल्या- भल्यांना गप्प करते त्यांची लहान बहीण
बहीण म्हंटल्यावर सुट तो अजुनही घाम,
लहान बहीण चे नाव घेता येऊन जातो ताप,
मग आठवतात बहिणी पासून वाचविणारे आई - बाप
पण बहीण ही बहीण असते ,
सुखाचा हलका झोका, मनातील गुपित हसू देखील असते,
कारण बहीण ती बहीण असते