मनातलं काहीतरी
मनातलं काहीतरी
शब्दांत मांडते तुला
शब्द फक्त तुलाच मांडतात
बघायला नयन माझे सदा
तुला मात्र तरसतात
श्वास माझा जसा
झाला तुझा आता पण
लेखणीत मात्र तू आता
प्रवेश मात्र केलेला
शब्द भाव लिखाण
आणिले एकत्रितपणे मी आता
हळू हळू ते मात्र तुज
शोधू लागले आता
ओढ आठवण कशी
वेगळीच असते जाणवले आता
आपल्यातील दुरावा मात्र आता
खूपच शिकवून चाललेला
प्रेमाच्या या भावनेत
गळाले अश्रूही कितिकदा मात्र
त्या अश्रूंचीही फुले करवुनी
वेचू लागले मी त्याजला

