STORYMIRROR

Gauri Tadklaskar

Others

3  

Gauri Tadklaskar

Others

निसर्गप्रेमी मी वेडी

निसर्गप्रेमी मी वेडी

1 min
240

असाह्य मन माझे कसे 

वेडेपिसे झाले

थबकुनी माझ्या जीवाला 

घोर लाऊनी गेले 


भलताच आला वारा 

म्हणाला टेन्शन घे जरा

त्याच वाक्याने मात्र मी 

हरवत गेले जरा


हळूच बोलला मोगरा 

नको लक्ष्य देऊ तू आता 

सुगंधाने माझ्या तू 

पड प्रेमात माझ्या 


दाटलेले अश्रू मी 

हळूच पुसून टाकले

अन खरंच त्याच्या 

सहवासात रमू लागले


पाखरू आले एक 

म्हणे किती ग वेडी तू 

संकटांचा डोंगर येऊनही 

कशी निसर्गप्रेमी तू 


मी त्याला म्हणाले 

निसर्गप्रेमी मी 

तुम्हीच लाविले मज वेड 

आता कितीही लोटले तरी 

जात नाही मी दूर 


वास्तव तुमचे शब्दात मांडिते

अन शब्द स्फूरांची एक कविता करिते


Rate this content
Log in