कोजागिरी
कोजागिरी
1 min
190
अंधाऱ्या आयुष्यात चमकत आली
ही कोजागिरी
प्रेमाचे प्रतीक ठरली
नभात आलेला काळोख
आज बाजूला सारून
सुखावणारी रात्र घेऊन आली
ही कोजागिरी सुखाचे किरण घेऊन आली
दुधाच्या प्रतिबिंबात
एकच मोती चमकू लागला
पाहून त्यावरील सायीने
मायेचे प्रेम पसरवू लागला
गोडवा त्यात
आपलेपणाचा साठविलेला
पाहुनी लाजून हळूच उगवला
कोजागिरचा चंद्र हा
जणू मजला भाळावू लागला
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
