मनाला ही मन असतं
मनाला ही मन असतं
खुप छान वाटतं मला
मला हसताना बघुन
तुझ ते मिश्किल होण
मनाला खुप भावत मला
मला रडताना बघुन
तुझ ते खिन्न होण
तुझ माझ्यात असणं
माझ तुझ्यात असणं
नाही आपल्यात काही वेगळेपण
आपलं ते खळखळून गप्पा मारणं
तुझ मला समजावन
करतो आपण आपले सांत्वन
नाही दीसत कोणाला तुझ रडणं
मला ते अतीव जानवन
मनालाही असतं मन
हे सांगत मला माझ्या स्वप्नाच दर्पण
