माझा आरसा
माझा आरसा
स्वप्न नाही माझे
प्रसिद्ध होण्याचे
तूम्ही मला ओळखता
एवढे पुरेसे आहे
चांगल्या ने चांगले बोलले
वाइट ने मला वाइट बोलले
ज्यांची जेवढी होती गरज
तेवढेच मला ओळखले
जिवनाची ही गाडी
खुप आश्चर्य कारक आहे
आठवणी कधी संपत नाही
पण वर्ष संपत जाते
एक वेगळीच
धावपळ ती जीवनात
जिंकलो तर अभिमानी बोलतात
हारलो तर आपलीच साथ सोडतात
म्हणूनच बसते मी एकांतात
मला माझाच स्वभाव आवडतो
मी अनुभवातून शिकले
कसे आहे जगायचे
माहीत आहे मला
माझ्यात कुठलाही गुण नाही
पण माझ्यात कुठलाच
अवगुण नाही हे चांगलेच माहीत आहे
लोक बोलतात मला खुप
तू हसते नेहमी खुप
पण दुःख लपण्यासाठी
नित्य हसणे शस्त्र आहे माझ्यासाठी
आनंदी राहते मी नेहमी
आणि ठेवते सगळ्यांना आनंदी
कदाचित माझ्यासाठी असेल मी निष्काळजी
पण सगळ्यांची घेते मनापासून काळजी
माहीत आहे काही ठिकाणी माझ्या विचाराचे मोल नाही
पण माझ्या परिवारासाठी मी कायम अनमोलच राही
हसऱ्या चेहऱ्या मागचे
दुःख मी नेहमी आरशात पाही
