STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

2  

vaishali vartak

Romance Others

मन वेडावले

मन वेडावले

1 min
25

भेट आपली पहिली

 मज नाही राहवले

माझ्या विचलित मना  

तूची मज सावरले     1


पहिल्याच भेटीतला

वाटे आश्वासक स्पर्श 

 दिले अनामिक सुख

देतो मना सदा हर्ष      2


छंद तुला बघण्याचा

कसे आवरु मनाला

तुझा ओझरता स्पर्श 

वेड लावितो जीवाला    3 


गंध तुझ्याच प्रीतीचा

सदा रहातो अंतरी 

मनी वसंत फुलतो  

 विश्वासाने ऊर भरी     4                


ऐक तू मम सखया

देशील ना तू साथ

मन तुझ्यात गुंतले

मागते मी तुझा हात     5


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance