Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

arvind mulye

Abstract Others

4.3  

arvind mulye

Abstract Others

मन-भावना

मन-भावना

1 min
68


मनातील मनाच्या प्रश्नांना 

उत्तर मिळतच नसते 

मन मनाच्या नाजूक भावनेत

सारखे गुंतत असते 


गालावरून अश्रू ओघळतात 

मनाविरुद्ध बंड पुकारतात

मनाचे रुदन तसे अखंड असते 

मनाला मनाचे पटतच नसते


अश्रुंना हे मन वेळेवर,

कधीच सावरत नसते

भावनांच्या पाचोळ्यांवर

हे मन वावरत असते


मन दुसऱ्या मनाशी

जुळवून घेत असते

मन कल्पनेच्या राज्यातही 

सारखे रमत असते


मना मनाचे कोडे, 

अजिब आहे

म्हणूनच मन हृदयाच्या,

करीब असते


मन दुःखाच्या काठीवर

सुखाचा वेल सजवते

म्हणूनच वाईटातून,

चांगले निघत असते


Rate this content
Log in

More marathi poem from arvind mulye