STORYMIRROR

Sanjeev Borkar

Romance

4  

Sanjeev Borkar

Romance

मिठी

मिठी

1 min
380

कुठे ना कुठे लपत छपत 

रोज ती भेटत होती मला

असे तिचे वागणे पाहून 

मलाही वाटे भेटावे तिला


तिच्या आठवणीचे घर

बांधू लागलो मी मनात

काय झाले ? कसे झाले ?

हे येत नव्हते ध्यानात


भावनांचा खेळ चांगला

रंगात आला होता खरा

कशासाठी कुणासाठी

याला नव्हता कुठेच थारा


मंद रात्रीची गोड मिठी

हवी हवीशी ती वाटली

कधी वाटे ही अशी का?

मला अचानक भेटली


एक दिवस हिम्मतीने 

मी स्वतःलाच विचारले

खरच मी तिच्या प्रेमात  

आहे हे तेव्हा मला कळले


 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance