मिर्गाची सर
मिर्गाची सर
येई सरींवर सर
त्याच्या उरात बहर
भुई राहिली गर्भार
आली मिर्गाची सर
धार देतोया लोहार
कसा सजतोया फाळ
दारी सांडते झरझर
आली मिर्गाची सर .
माय मातीला डोहाळे
घेते मिठीत आभाळ.
भुई राहिली गर्भार
आली मिर्गाची सर
रानी नांगराचा फाळ
कसा चिरतोया उर
भुई राहिली गर्भार
आली मिर्गाची सर.
बाप पेरतो सपान
मागे आभाळाचे दान
त्याचा फुलतो उर
आली मिर्गाची सर
