STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

3  

Durga Deshmukh

Romance

मिलनाची आस

मिलनाची आस

1 min
188

मिलनाची आस 

विश्वासाचा ठेवा 

कधी येणार गावा सख्या 

कधी येणार गावा 


संध्याकाळ येई राया 

तुझ्या विरहाची 

मनी सजते स्वप्न 

रात चांदण्याची 

येता पावसाची सर 

अंगी गारवा दाटावा 


कधी येणार गावा सख्या 

कधी येणार सख्या //1//


तुझ्यासाठी केले पुण्य

किती उपवास 

देवाने दिला मला 

तुझा सहवास 

जवळ येताना तु 

कंठ का दाटावा 


कधी येणार गावा सख्या 

कधी येणार सख्या//2//


आठवण येता राया 

जीव बेजार 

तुच माझ्या जीवनाचे 

जगण्याचे सार 

नजर पडता तुझ्यावर 

बंध का तुटावा 


कधी येणार गावा सख्या 

कधी येणार गावा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance