मिलन
मिलन
सांज रात झाली
बेधुंद मन हे झाले,
येता मिठीत तुझिया
मी मोहरून गेले
हा बाहुपाश मजला
वाटे हवाहवासा,
आलिंगनात तुझिया
वाटे मना दिलासा
रात्रीस खेळ चाले
नभात चांदण्यांचा,
तो साक्षीदार चंद्र
ह्या तृप्त मिलनाचा
या मंदधुंद रात्री
माझी न राहिले मी,
तुझ्यामध्येच आता
एकरूप जाहले मी
नाजूक या देहाला
तुझीच आस आहे,
तुझ्यात गुंतला हा
माझाच श्वास आहे

