मी शांतच निजलेले....
मी शांतच निजलेले....
एक दिवस असा उजाडला
निजले होते शांत मी
उठवत होते सगळेच मला
मात्र मी शांतच पडून राहिले...
मला शेवटची अंघोळ घालायची
तयारी चालू झाली होती
ज्याला त्याला घाई मला
डोळे भरून पाहण्याची झाली
पण मी मात्र शांतच निजलेले...
ज्यांच्या अंगा खांदयावर
माझ बालपण गेलय
बहुतेक यांच्या आसवांच्या
धारेन मी चिंब भिजले होते
पण मी शांतच निजलेले...
जोरजोरात सगळेच रइून मला
उठवत होत ना तेवढ्यात
माझ्याच कुणीतरी विचारल
अजुन किती वेळ लागेल
तरीही मी शांतच निजलेले...
कुणी तरी न्हेऊ नका असं
मोठयान सारख म्हणत होत
वैराच ही प्रेम आज
माझ्यावर पडत होत
पण मी शांतच निजलेले...
शेवटची अंघोळ घातली
गरम पाण्याची मला
जवळचेच सारे होते त्यांनीच
पुन्हा उचलून घेतल
पण मी शांतच निजलेले...
सरणावर झोपवून मला
अजून चार लाकड द्या
अस कुणीतरी म्हंटल
तरी मी मौन पागून
शांतच निजलेले...
आज वेगळच काहीतरी
घडल होत जरास
शेवटी जीव लावणाऱ्या
माझ्यांनीच मला आज
जाळलं होत.....
