STORYMIRROR

Aruna Garje

Romance

4  

Aruna Garje

Romance

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

1 min
295

माणूस फक्त प्रेमाचं... 


परवा परवाच आमचं 

झालं होतं लग्न 

गुलूगुलू बोलण्यातच 

आम्ही दोघं मग्न 


वाट होती रानातून 

आभाळ आलं भरून 

चालू लागलो मीही

तिचा हात धरून 


एवढ्यात सुरू झाला 

सोसाट्याचा वारा

कोसळू लागल्या संगतीनं

झरझर पाऊसधारा 


एकाच छत्रीत दोघे

मजेत लागलो चालू

ढगांचा तडमताशा

वीज लागली बोलू


छत्री असून दोघेही

चिंब चिंब भिजलो

सुटताच गार वारा 

अधिकच बिलगलो


तिच्या ओल्या अंगाचा

जाणवला मादक गंध 

ती अधिकच बिलगली

अन् मीही झालो बेधुंद 


चिंब चिंब भिजणंही

असतं भलतच सुखाचं

संगतीला असावं लागतं

माणूस फक्त प्रेमाचं 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance