महिमा गजाननाची
महिमा गजाननाची
मी माझी एक रचना आपल्या पुढे सादर करतो , आशा आहे आपल्याला माझी ही रचना आवडेल ।
आपल्याला माझी ही रचना कशी वाटली ती सांगायला विसरू नका आपल्या अभिप्रायची मी वाट पाहेल।
चला मग सुरू करूया थोडी माहिती सोबत
सर्व वाचक मित्र मैत्रिणीनां जय गजानन ।।
महिमा श्री गजानन बाबांची
आलो तुझ्या दर्शना
ठेव मला ठायी
दूर नको करू चरणांशी माझी गजानन माय ।
जिथे जातो तिथे दर्शन तुझे होते
मनामनात तनामनात तूच ठायी ठायी ।
माघ वद्य सप्तमी दिनी तू प्रगटला शेंगावी
घेतली संजीवन समाधी ऋषी पंचमी पुण्य दिनी
मनाचिया होते सोहळा येता दर्शना तुझ्या
चित्त माझे उसळती होता दर्शन माऊलींचे ।
सोबत असता तू गजानन नसे भीतीच कशाची
चरणी मागणे एकच ठेवी मज आता सानिध्यात तुझ्या दिन रात ।
राहतो भक्तांच्या कायम उभा पाठीशी
अन्न हे पूर्णब्रह्म, अशे शिकवण जयांची ।।
थोरवी मी काय सांगू तुम्हा त्या गजानन बाबांची
कधी वाटे जिवलग मित्रा सम तर कधी ती माऊली माझी ।।
थोरवी मी काय सांगू हो मी माझ्या माऊलींची
पाठीशी असतात उभे कायम नसे चिंता जगताची ।
नसे चिंता जगताची ।।
तुझाच
देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले
मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका। कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेच।।
यावरून श्री महाराजांचे त्यांच्या भक्तां वरील त्यांचे प्रेम दिसून येते।
श्री महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे।
श्री महाराज समाधी घेण्यापूर्वी म्हणाले
दुःख न करावे यत्किंचित । आम्ही आहो इथेच तुम्हा सांभाळण्या परी सत्य । तुमचा विसर पडणे नसे।।
देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदा कार झाले आहेत।
त्या या मुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे।
आजच्या दिनी गुरू माउलींना एवढेच मागणे की
आपली कृपादृष्टी सदैव आपल्या भाविक भक्तांवर अशीच असू द्या
श्री गजानन माऊली हि त्यांच्या भक्तांसाठी अमूल्य संपदा आहे।
।। ओम नमो भगवते गजानन नमो नमः ।।
।। गण गण गणात बोते।। ।। श्री गजानन जय गजानन ।।
