STORYMIRROR

-harsh_मधुरज़०✍️ HRG

Others

3  

-harsh_मधुरज़०✍️ HRG

Others

तुला भेटण्याची भिती वाटते

तुला भेटण्याची भिती वाटते

1 min
771

 तुला भेटण्याची भिती वाटते

आयुष्यातल्या आपसूकच जुडलेल्या

नात्याची दोर

तुटण्याची भिती वाटते,

आठवून हे, तुला विसारण्याची भिती वाटते

हे असं ही कधी घडलं तर काय होईल

मनातल्या ह्या विचारांची भिती वाटते

गर्दीत ही एकटं असण्याची भिती वाटते ।

माझ्या काळजाची ओढ तू ,

आयुष्याला माझ्या पडलेलं गोड स्वप्न तू ,

मधातच तुटेल साथ अशी भिती वाटते

तुला भेटण्याची भिती वाटते ।

धुके दाटले लोचनाच्या नभात या

दूर तुज पासून जाताना

विसरेल कसा सांग माझा मी आता ।

तुला शोधण्या जीव हा वेडावला ,

शोधतांना तुला स्वतःला गमावण्याची भिती वाटते

तुला भेटण्याची भिती वाटते ।


Rate this content
Log in