Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

-harsh_मधुरज़०✍️ HRG

Romance

3  

-harsh_मधुरज़०✍️ HRG

Romance

प्रेम बंध-त्या प्रीतीचे

प्रेम बंध-त्या प्रीतीचे

2 mins
127


 प्रेम 【 बंध-त्या प्रीतीचे 】प्रीत बहरताना,

तू सोबत असताना ।

उमले त्या धुंद मधाळ भावना

मग बंध जडतात मनास ह्या त्या जाई-जुई च्या

वर्षाव तुज्या,

त्या तारुण्याचा जेव्हा

रिमझिमता माझ्यावर बरसतो

चाहूल माझी न मग मलाच राहते ,

चिंब न्हायहुनी त्यात नकळत मी ओघळून निघतो

थरथरत्या त्या तुज्या स्पृश्याला

स्पर्शून तू

मनाचा ताबाच मग मी घालवतो

प्रिये रेशीम तुझ्या त्या लावण्याचे

जगी आभास मग प्राप्त ते मज होते ।

असशील सोबत तर

बांधेल मी त्या गगणास ही झुला तो

आपुले ते क्षण हळवे,

घालवलेल्या त्या एकांताचे

वाटे

मग बिलगुनिया मजला तू ते

मज कायम ऐकवतच राहावे ।

जीव माझा हा आता व्याकुळला

प्रिये जवळ येऊनि ,

घेऊनी तुझ्या समवेत आज

सप्तसुरात तुझ्या त्या गावून तू आज

मज परत एकदा बावरून टाक ।

जीव हा माझा गुंतला तुझ्यात

तूच तू दिसे मला क्षणा-क्षणात

सावरू कसा स्वतास मी तू सांग ना

तू फुलवंती तू जलवंती

तूजच शोभे त्या नजरेच्या बाणा ,

खाणा खुणा करीत करिसी व्यक्त प्रेम आपुले

त्या कोरीव नक्काशीदर त्या रेखाक्षरा वर, 

घालुनी त्यात बदाम मग

कोरिसी नाव आपले सखे

म्हणे असेच कायम असो बंध आपल्या त्या प्रीतीचे


सर्व वाचक मित्र मैत्रिनांना माझा नमस्कार

आपल्याला माझी ही नवीन रचना

" प्रेम 【 बंध-त्या प्रीतीचे 】

कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य रेटिंग , स्टिकर आणि त्यावर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे कळवू शकता आणि जर का आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आपण माझ्याशी संपर्क साधून त्या मुक्तपणे व्यक्त होऊ शकता ।

आपल्या सर्व अभिप्रायचे व तसेच सूचनांचे सहर्ष स्वागत आहे

आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।


आपलाच एक वाचक लेखक मित्र


टीप : - सदर रचनेचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही तरी ती आपण वाचताना त्या विषयावर असलेली केवळ एक काल्पनिक रचना असे ग्राह्य धरून वाचावी ही विनंती ।


Rate this content
Log in