महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
शिवशंभूची मायभूमी
करीतो मावळे राखण
भगवा झेंडा घेऊन केले
हिंदवी स्वराज्य स्थापन...
महाराष्ट्राची मराठी बोली
जगतो तुझ्या भाषेसाठी
जपतो तुझा स्वाभिमान
बोलतो आम्ही मी मराठी...
आदर्श आमच्या महाराष्ट्राचे
टिळक आणी वीर सावरकर
टिकवून तुमची संस्कृती
जिथे असे तुकाराम, ज्ञानेश्वर...
विविध कलांनी नटलेली
ही महाराष्ट्राची भाषा
जिथे प्रत्येक सणाला
वाजितो ढोल आणि ताशा...
मायाळू माणसांची संस्कृती
दिली शिकवण सर्व धर्मांना
महाराष्ट्रामध्ये जन्मालो आम्ही
कला, संस्कृतीचा अभिमान सर्वांना...
