STORYMIRROR

Raj Jogdand

Inspirational

4  

Raj Jogdand

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
23.7K

शिवगर्जना महाराष्ट्राची,

सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात,

छत्रपती शिवबा जन्मले,

आऊसाहेबांच्या कुशीत...


यवनांचं क्रूर आक्रमण,

धुडकावती धारदार शस्त्र,

शिवशंभू छावा सिंहाचा,

क्षेमिले स्वराज्य महाराष्ट्र...


भद्र विचारांची पेरणी,

रुजविती तत्वज्ञान शास्त्र,

भूमी थोर साधूसंतांची,

घडविती वैकल्पिक महाराष्ट्र...


गडकिल्ल्यांचे अतुल्य वैभव,

वरचढ सात आश्चर्यास,

सौंदर्य मनुष्याच्या मनाचे,

भजतो महाराष्ट्र विठ्ठलास...


संस्कृती, परंपरांचे माहेरघर,

भारताचा तेजस्वी दीपस्तंभ,

वाढवू शान महाराष्ट्राची,  

उजळूया आणखी करूया आरंभ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational