महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र माझा...
महान ऐसे महाराष्ट्र राज्य||
जेथे वसवले छत्रपतींनी साम्राज्य||1||
प्रथम पूज्य गणपती देव पुण्याला||
खंडोबाराया वसे जेजुरीला||2 ||
अजिंठा-वेरुळ शान आमची||
चित्रपटसृष्टी आन आमची||3 ||
हापुस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे देवगड||
आजही राजधानी आहे किल्ला रायगड||4 ||
पर्वतातून वाहते ती कृष्णा-गोदावरी||
आजही उभा आहे विठ्ठल विटेवरी|| 5||
येथे कणकणात शूरवीराची गाथा||
आजही मिळेल एका मराठ्यात लाख मराठा|| 6||