मधुसिंधू काव्य
मधुसिंधू काव्य
आजी आजोबा
आजी आजोबा
असतात गोड
प्रेमा नाही तोड
आम्ही लाडोबा
हवी जवळ
अत्तराची कुपी
दरवळ रूपी
देतसे बळ
मजला भास
विठू रखूमाई
वडिलांची आई
दिसता खास
हातात काठी
द्यावा तो आधार
घोड्यासाठी स्वार
फिरावे पाठी
नसते गय
परवचा पाढे
उजळणी वाढे
नसेच भय
नीज न येता
गोष्टी कृष्ण,राम
मुखी ईश नाम
कुशीत घेता
