मधुसिंधू काव्य शाळा
मधुसिंधू काव्य शाळा
आमच्या शाळा
झाल्या आता सुरू
ज्ञान देती गुरू
खडू नि फळा
शाळेत जाऊ
सुधारूया वाणी
कविता नि गाणी
हर्षाने गाऊ
करू अभ्यास
मिळवून ज्ञान
गुणवत्ता छान
धरून ध्यास
होई विकास
खेळ,भाषा,कला
अंगिकारू चला
मूल्ये ही खास
शाळेत मुले
खेळात रमती
विज्ञान गमती
व्यक्तित्व खुले
संस्कार देती
जीवना आकार
स्वप्नेही साकार
गगनी नेती
