मधु रात्री
मधु रात्री
तो एक चंद्र
आणि एक तू
आठवणीने भेटता
तो चांदणे
तू प्रेम वाटते
तोही मोहक शीतल
जसे स्मित तुझे मधाळ
चांदण्याचे शिंपण आकाशी
तुझा सहवास जसा रात्री
अल्हाद चंद्र प्रभा
जणू स्पर्श तुझा लाघवी
दूर तोही, जशी तू
मन समिप तरीही
पाहता त्याला
दिसतेस तू
म्हणते जणू
मधु ओठी, मधु मनी
मधु स्वप्नि, मधु रात्री
