माया तुझी आभाळाएवढी
माया तुझी आभाळाएवढी
माया तुझी आभाळाएवढी
देवा तू कसा रे
जन्म दिला या भुतलावर
मानवाचा मला रे ।।१।।
वेळोवेळी आला देवा
भक्तांच्या मदतीला तु
आता का पाठ फिरवली
कोरोनाच्या महामारीत तू ।।२।।
असे वाटले मानवाला
पन चुकिचे आहे रे
आला तु मदतीला
पोलिस, डाॅक्टरांच्या रुपात रे ।।३।।
वाईट वाटते रे देवा
माणसाला माणूस नाही झाला
कोरोनाच्या महामारीत
माणुसकीच विसरुन गेला ।।४।।
तू मात्र तसाच राहिला
मदतीला आला रे जोडी
डॉक्टर, पोलिसांच्या रुपात
माया तुझी आभाळाऐवढी ।।५।।
