STORYMIRROR

Komal Shinde

Inspirational

4  

Komal Shinde

Inspirational

माय मराठी

माय मराठी

1 min
358

मायबोली असे माझी

सर्व भाषांतून थोर

मराठमोळी पदरावर

नाचे जरतारी मोर..


काना, मात्रा, वेलांटी

अलंकारांचा त्यावर साज

विश्वभरातून ऐकू येते

माझ्या मातृभाषेची गाज..


शब्दमाळेत गुंफूनी

शब्दांतून सजली

शब्दशृंगार करुनी

काव्यातूनी अवतरली..


ज्ञानेशाचे पसायदान

त्यात आयुष्याचे ज्ञान

जगाचे सार ओतुनी

सांगितले सर्वां तत्वज्ञान..


मायबोलीत सजले

अभंग नि भजनं छान

गोडी वाटे सत्संगाची 

शब्दातून जागे अभिमान..


नाळ माझी मराठीशी

जडली जन्मापासून

आत्मभान जागविले

मौलिक संस्कार जोपासून..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational