मातृभूमी
मातृभूमी
डोळ्यात स्वप्न जागे,
माणसे दंग झाली गर्भात मातृभूच्या,
स्पंदने आज निजली उरला तो श्वास केवळ,
कित्येक शहीद झाले इतिहास वाचावयाचे,
दिवस आज आले आपलेच रक्त सांडवि,
होऊनि वैरी कुणी न घडो रक्तकांड,
पुलवामा जागवुनी सर्वत्र नक्षल्यानी,
दडपण लादलेले बिगुल पुन्हा नव्याने,
विरानी छेडलेले ना जाहली निराशा,
शिखर गाठताना त्या रक्तरंजित गाथा,
पुन्हा वाचतांना संपन्या वैर सारे,
पुन्हा रक्त गाठी शेवटी प्राण माझा, मातृभूमी साठी.
