STORYMIRROR

Kaiwalya Kulkarni

Abstract Tragedy

4  

Kaiwalya Kulkarni

Abstract Tragedy

मानवतेची पहाट फुटू दे

मानवतेची पहाट फुटू दे

1 min
359

कुठे हरवली मानवतां रे दानव तू झाला

मानव्याला चुड लावण्या पुढे पुढे चालला


नव्या युगाचे नविन वारे तुझ्या भोवतीचे

त्यात तुला ना मोल राहिले या संस्कारांचे


रूढी आणि परंपरांचे जोखड वाटे तुला 

संत ऋषी अन् शिवबाला तू पूर्णपणे विसरला


विचार नाही आचारातही राहिली न शुचिता

माय बहिणी गोमातेची पूजा कसली आता


उपभोगांच्या दुनियेमध्ये मन:शांती नाही

क्षुधा तृषेची मुळी तुझ्या रे तृप्ती ना होई


मागे वळुनी पहा जरा ही माय वाट पाहते

तुझे तुला रे कळेल आपुले गांव बरे होते


मानवतेची पहाट फुलू दे तुझ्या जीवनांत

सावलीमधे विसावताना होते मन शांत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract