STORYMIRROR

Kaiwalya Kulkarni

Abstract

3  

Kaiwalya Kulkarni

Abstract

लाडकी

लाडकी

1 min
237

माझ्या लाडक्या लेकीचं 

कसं कौतुक मी करू

माझ्या पदरात चंद्र 

त्याला कशी मी आवरू


    हसू लाडिक डोळ्यांत

    पडे प्रेमानं गळ्यांत

     लाडीगोडी लावतांना

     लागे भोवताली फिरू


अशी लावण्य पुतळी

पडे गालावर खळी

 हिच्या हास्यातून दारी

 लागे चांदणं.पाझरू


    शब्द हिचा जणू गाणं

   पैंजणांची रूणझूण

    माझ्या बागेतली वेल

    आता लागली बहरू


सुख हिच्या पायी आलं

घर आनंदानं न्हालं

माझ्या लाडक्या पिलाची

कशी दृष्ट मी उतारू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract