STORYMIRROR

Sakshi Bhujbal

Tragedy Others

3  

Sakshi Bhujbal

Tragedy Others

माणूस मात्र कुठेच नाही....

माणूस मात्र कुठेच नाही....

1 min
282

धावपळीच्या आयुष्यात माणूस मात्र कुठेच नाही...

आज घरं आहे पण त्यात घरपण नाही

माणसं आहेत पण त्यांना माणुसकी नाही

नाती आहेत पण त्यात प्रेम नाही

मातीच्या घरांना जसा सिमेंटचा गिलावा आला

तसा माणसांच्या मनावर पैश्यांचा परिणाम झाला

पैसा पैसा करत पैश्यांच्या मागे धावत सुटला

आणि एकमेकांशी असलेला संपर्कच तुटला

सगळ काही ऐशोआराम भेटला त्याला

पण त्यात सुख मात्र कुठेच नाही....

सध्या खेळ आहेत पण ते मैदानात नाही

स्वयंपाक आहे पण चुलीवर नाही

कार्यक्रम आहेत पण ते एकत्र नाही

सगळकाही आहे पण माणूस मात्र कुठेच नाही.....

आजी आजोबा आहेत पण घरात नाही

भाऊभावंड आहेत पण एकत्र नाही

आयुष्यात गाणी आहेत पण लय नाही

नृत्य आहे पण ताल नाही

असच काहीसं आयुष्य आहे 

सगळकाही आहे पण माणूस मात्र कुठेच नाही...

आयुष्यात रिमझिम आहे 

पण मातीचा तो दरवळणारा सुगंध नाही

समुद्र आहे पण लाटांचा तो खळखळाट नाही

मैत्री आहे पण शंभूराजे आणि 

कवी कलश यांच्यासारखी नाही

असच काहीसं सगळकाही जवळ आहे 

पण यात माणूस मात्र कुठेच नाही

असं वाटतं एकदा तरी मागे वळून पहावं त्याने 

पैश्यामागे पळण सोडून द्यावं

सुखापुरता पैसा कमाऊन ओंजळीत घ्यावा

अन् क्षणभरासाठी का होईना या धावपळीच्या

जगातून विसावा घ्यावा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy