STORYMIRROR

Sakshi Bhujbal

Romance

3  

Sakshi Bhujbal

Romance

घायाळ अदाकारी

घायाळ अदाकारी

1 min
193

तुझ्या घायाळ नजरेचा भार

माझ्या लेखणीने किती घ्यायचा...

लिहिता लिहिता तुझ्यावर एक दिवस जीव माझा जायचा....

तुझ्यावर लिहायला मनात शब्दांचा झरा नव्याने पाझरतो

न्याहळत न्याहळत रूपाला तुझ्या मन माझं मी हरवतो...

खूप काही आहे तसे मनात साठलेले

काही शब्द वाचशील तु माझ्या कवितेतून सुटलेले..

तुझा शृंगार पाहून मन माझे गालातल्या गालात हसून

जाते...

अन् तू शब्दात येण्याची वाट पाहते...

तुझ्या नथीचा आकडा खुलतो तुझ्या नाकावर

हळूच तुला डोकावून पाहून फुलेही लाजतायेत केसांवर...

कळत नाही कसे मोहक हसू तिच्या गालावर चढून येते

अडकलोय पुरा आता तुझ्यात चित्त माझे हरवून जाते...

काळजाच्या रंगात रंगून आज गुपित मी खोलतो

अन् आज तुझ्या या अदाकारिंशी मी बोलतो...

कितीही लिहिले मी तुझ्या सौंदर्यावर शब्द अपुरे पडतील

कितीही लिहिले कवितेत तरी काही शब्द तुझ्यात उरतील....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance