माणुस म्हणून जग!!!
माणुस म्हणून जग!!!
आधुनिकतेच्या दुनियेत नातीसुद्धा
ना Gurantee ना warranty
तत्वावर निभावण्याची modern
फॅशनचं झालीये
माणुस म्हणुन जग!!!
चौकोनी भिंतीच्या पिंजऱ्यात
असं किती राहणार बंदिस्त
मुक्त सौंदर्य उधळणाऱ्या
निसर्गाचा आस्वाद चाखत
आनंदी माणुस म्हणुन जग!!!
परक्यातलं आपलं अन् आपल्यातल वैर
ओळखायला शिकत
माणुसकीची मशाल हाती घेऊन
भेदभाव जाळून बघ
अन् या भयानक कलियुगात
माणुस म्हणुन जग!!!
