माणसा ...
माणसा ...
माणसा जरा माणूस होवून जग
जीवन खूप सुंदर आहे,
तुझ्यात माणुसकी उतरवून बघ.
नको रे चोरी, मारहानी
या क्रोधी वृतीतून निघ,
सत्याची वाट पकडून
माया,करुणा सिख.
जीवनात आश्या आकांक्षा कमी ठेव
जगण्याच्या नवीन दिशा भेटतील,
आहे त्यात जरा समाधान मान
नाहीतर जीवनात
अंधारच अंधार दाटतील.
झोपी जाते ही समदी रात
पण तु का जागा?
शेवटी जाताना रिकाम्या हातांनीच जायचंय
तू मात्र
माणुसकी सोडू नको उगा.
