नाथा...
नाथा...
1 min
194
भाजत्या मातीला ना पाऊसाची साथ
देवचार नाचे भुई आहे कुठे नाथ?
नाथा बोल बोल बोल का
नाही तुझी साथ.
दीन दिनभर तुला देवा पेटवीतो वात
नको करु त्याच्या आता जीवनाचा घात,
नाथा बोल बोल बोल का
नाही तुझी साथ.
दीनकर राबती पाऊसा पाहिली ना रात
वय झाले साठ आता पोटा आल्या गाठ,
नाथा बोल बोल बोल का
नाही तुझी साथ.
राबत्या भुईला ना भेटे पाण्याचा माठ
भेगाळली माती होई पाण्याविना घात,
नाथा बोल बोल बोल का
नाही तुझी साथ.
शिवार ओसाड झाले, नाही दीना आता वाट
झाडाला देह झुले मग होई ती ही सती नाथ,
नाथा बोल बोल बोल का
नाही तुझी साथ.
