माकडाची कमाल सशाची धमाल
माकडाची कमाल सशाची धमाल
माकडा माकडा हूप हूप हूप
झाडावर बसतो चूप चूप चूप
गालात ठेवतो खाऊ भरून
खात बसतो झाडावर चढून
असा रे कसा तू ससा
पांढरा पांढरा कापूस जसा
लाल लाल डोळे छान
छोटे शेपूट मोठे कान
अंगावर पडता छोटे पान
उडी मारतो लांबच छान
येशील का राहायला माझ्या घरी
देईन तूला रोज गाजर भारी.....
