माझ्या शालेची वाट
माझ्या शालेची वाट
माझ्या शालेची गे वाट,
एक आठवनीचि माल.
रोज़ चढ़े अन रोज़ उतरे,
तिच्यावरुन आमुची कमान.
दर रोज़ नइ बात
काय सांगु ग गडे मी तुले
कधी गाई पुढे आम्ही
कधी गाय आम्हा पुढे.
ओसरल्या सर्व आठवनि
पण वाट अजून जीवंत असे
माझ्या मनाच्या बस स्थानी
ती वाट थांबली असे.
एक पाउस एक हिवाला
असाच येइ तो उन्हाला
दपतर माझी माय
दपतर माझा बापूस
प्रेम करी माझ्यावरी
उभा राही करी रक्षन.
अनवानि माझे पाय
अनवानि माझी पाटी
आज दोनही भरून निघाले
रेघोट्या अनुभवाची चकाकी.
वाट जरी ती एकाकी
शाला माझी लय भारी
बाईंचा शाब्बास ऐकायला
हर कोई रप-रप जाई.
रस्ता तो आठवितो
मग काई उने वाटत नाय
ती वाट चढलो
मग आत्ता ची काय!!!!!
