माझी शाळा
माझी शाळा


शाळा
बघवत नाही माझ्या
शाळेची अवकळा
कोरोनामुळे आता
बंद झाली शाळा
नाही कुठे गोगांट
नाही कोणाची हाक
उगाचच होतात मला
मुलांचे हे भास
फळा राहिला कोरा
असेल जरी काळा
बंद शाळा पाहून
पोटात येतो गोळा
डुलत नाहीत आता
शाळेच्या बागेतील फुले
कारण दिसत नाहीत
शाळेत बागडणारी मुले
नाही निघत आता
स्वयंपाक घरात धूर
बघवत नाही आता
नयनी येतो पूर
नाही गोष्टी, नाही गाणी
मुले बोलू लागली
लॉकडाऊन मुळे या
शाळा पोरकी झाली
ना गुरुजी, ना बाई
ऐक
ू येती साद
केंव्हा येईल ऐकाया
मुलां मधला संवाद
गुरुजी झाले दूर
मोबाईल जवळ आला
ऑनलाईन अभ्यासाचा
मुलांना कंटाळा आला
करमत नाही आता
खूप कंटाळा आला
जावे वाटे शाळा
पण काळ घालेल घाला
माहीत नाही मला
कोणी केला गुन्हा
वाट पाहतो मी केव्हा
उघडेल शाळा पुन्हा
मुले म्हणती आता
बस्स झाली सुट्टी
अभ्यासासी आता
पुन्हा करूया गट्टी
कोरोनाचे संकट
लवकर जाऊ दे
आणि माझी शाळा
परत गजबजू दे