ती
ती


प्रत्येकाला ती असते
जी जीवापाड प्रेम करते
सुखात नि दुःखात
ती नेहमी साथ देते
आठवते ती
पदोपदी
आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी
तिच्या शिवाय
करमत नाही
बघितल्या शिवाय
राहवत नाही
नाही दिसलो की
काळजीत ती राहते
प्रत्येक क्षणी मला
सावध ती करते
आपल्यासाठी ती
धडपडत राहते
दुसऱ्यासाठी नेहमी
आपण जगत असते
तिची माया जगा
वेगळीच असते
विजयासाठी ती
प्रेरणादायी ठरते
तिला विसरणे
अशक्य असते
कारण तिची जागा
नेहमी हृदयात असते
माझ्या विजयात
ती आनंदात असते
पराभवात ती
मला कुरवाळते
संकटात ती करते
देवाचा धावा
माझे आयुष्य दे
तू माझ्या लाडक्या
होय ती सर्वांची
असते लाडकी
माझ्यासाठी ती
देवापेक्षा ही मोठी
ती नसली की
घर रिकामे वाटते
ती आली की
घराला घरपण येते
आयुष्यात तिला
काही नको आणि
नाही पाहवत तिला
माझ्या डोळ्यात पाणी
ती आहे म्हणून मी
बाकी काही नाही
तिच्या शिवाय जगात
आणखी काही नाही
होय ती माझी आई
तिच्याविना कोणी नाही