माझे वडिलांवर एक कविता
माझे वडिलांवर एक कविता
आजहि आठवतो तो लहानपणीचा मार
त्यात पण मज्जाच यायची थोडीफार
तुम्हिच दिलेय मला "जिवनाचे -प्रशिक्षण"
नी नंतर घे म्हणे स्वतःच्या अनुभवातुन" शिक्षण"
तुम्हि सांगतात नेहमी
"बेटा, नाहि दुखवायचे कधी कुणाचहि मन ,
आधी चांगली माणसे कमाव मग
पोटपाण्यासाठी मिळवच थोडे बहुत धन.......।
आपल्या शेतीतल पिक नी कसदार मातीने
सांगीतले जिवनभर जप अनोळख्याबद्दल
पण पक्की भाऊबंधकिच्या नाती !!!
वाटता तुम्हि कधी मजसाठी आंतरिक दर्पण
मानावा तुमचा स्वभाव नी त्यातले खरपण !!!
आपलाच आर्दश पुढे ठेवुन मी घडतोय
उभ राहुन नव्या दमाने चालु लागतो जरी
पुन्हा पुन्हा रस्त्यावर ठेच लागुण मी पडतोय !!!
