माझे बाबा
माझे बाबा
कुणालाही हेवा वाटेल असे आहेत माझे बाबा
सर्वांनी त्यांचा आदर करावा असे आहेत माझे बाबा
साधी रहाणी उच्च विचारसरणी असे आहेत माझे बाबा
सर्वांच्या सुखासाठी झटतात असे आहेत माझे बाबा
कुणालाही दु:ख होऊ नये याची काळजी घेतात बाबा
माझ्यावर तुमची नितांत माया आहे मला ठाऊक बाबा
कधी बिबटया तर कधी बाळा अशा टोपण नावे बाबा
हाका मारत असता लाडाने हे आवडते मला बाबा
क्षणाक्षणांचे कौतुक असते तुम्हाला माझे बाबा
प्रेमळ रुपी हात पुढे जाण्याची प्रेरणा देते बाबा
आईशी वाद झाल्यास पाठीशी उभे असतात बाबा
मायेच्या पंखाखाली घालवलेले क्षण असे विसरू बाबा
चंदनापरी झिजून सुगंध पसरवतात माझे बाबा
जगात नाव कमवून नावलौकीक मिळवीन बाबा
आदर करावा सर्वांनी असे आहेत माझे बाबा
कल्पवृक्षापरी सावली राहो ही मनोकामना बाबा
निरंतर तुमची साथ लाभो हीच विनवणी असे बाबा
