माझा श्वास माझा ध्यास मायबोली
माझा श्वास माझा ध्यास मायबोली
गावरानी गोडव्याची बोलतो मी मायबोली
अमृताची घोट प्याली जाणतो मी मायबोली
संतवाणी लोकवाणी ऐतिहासिक ती जुबानी
काळजाच्या आतमध्ये राखतो मी मायबोली
माणसाने माणसाला प्रेमभावे वागवावे
विश्व सारे सौख्य पावो मागतो मी मायबोली
भारताच्या वैभवाची साक्ष आहे दिर्घकाळी
वैभवाच्या त्याच मार्गी चालतो मी मायबोली
भाग्यरेषा तूच माझी जन्म होई सार्थ माझे
जीवनाचा अर्थ आता साधतो मी मायबोली
माय आम्ही पांग फेडू वचन घे या लेकराचे
चालताना बोलताना दावतो मी मायबोली
ती मराठी माय माझी धन्य झालो तृप्त झालो
जीवनभरी दुग्धपान्हा चाखतो मी मायबोली
