STORYMIRROR

Nandu Damodhare

Others

3  

Nandu Damodhare

Others

कुणाच्या श्रमावर कुणाची दिवाळी

कुणाच्या श्रमावर कुणाची दिवाळी

1 min
395

कुणा रोज सांगू नभी रात काळी

कुणाच्या श्रमावर कुणाची दिवाळी

इथे भाकरीला रडे चंद्रमौळी

तिजोरीत तेथे सुखे मांदियाळी

कसा लेकरांना भरोस्यात ठेऊ

उद्या त्यास खाऊ मिळावा फराळी

धनी कुंकवाचा कुणी दूर नेला

कशी वैर झाली अमावस कपाळी

कसा दीप लाऊ उगी अंगणी ह्या

गळा फास जर का बळीचेच भाळी

सुखाशी बळीला असू दे निसर्गा

सदा सातबारा हसावा सकाळी

कुणीही नसावा भुकेने उपाशी

कुणाच्याच दारी नसो रात्र काळी


Rate this content
Log in