Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chaitanya Desale

Drama Inspirational

3.9  

Chaitanya Desale

Drama Inspirational

लुकलुकणार्‍या तार्‍यांनी आज विचारले मजला .

लुकलुकणार्‍या तार्‍यांनी आज विचारले मजला .

1 min
198


लुकलुकणार्‍या तार्‍यांनी आज विचारले मजला .

की, आयुष्याच्या गडबडीत , तुझ्या स्वप्नांचा दिवा का विझला ?

लहानपणी, चंद्राला स्पर्श करण्याची इच्छा दाखवणारा

आज स्वतःचे हर्षच विसरून बसला .


जबाबदारीचे डोंगर मोठे.

  कधीच संपत नाही तुझे.

‘लोक काय म्हणतील?’ हा एक प्रश्न.

वाढवतो हृदयावर दडपणाचे ओझे.


कामाच्या व्यापात संपताय ,

  तुझ्या जीवनाचे सारे आठवडे.

‘एकदा तरी तू पलटून बघशील’ ,

 ही आस लावून बसलेत तुझे स्वप्न वेडे.


जे तुझे वेड होते पूर्वी ,

  त्याला आता तरी वेळ दे.

ह्या भावी युगाला ,

  तुझ्या निर्भीड विचारांचा मेळ दे .


तू ज्या स्वप्नाला पाहिले होते ,

आता त्या स्वप्नांना तुला पाहायचय .

ह्या जीवनचक्रात व्यग्र होणे सोडून ,

 तुला व्यक्तिपासून एक शक्ती व्हायचय .


लुकलुकणार्‍या तार्‍यांनी आज सांगितले मजला.

होईल प्रभात लवकरच जरी रातीस देह निजला.

सूर्याच्या उष्म श्वासात प्रखरशील तू.

करुनी स्वप्न पूर्ण , ज्यासाठी तू जन्मला .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama